जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडून ५ हजार मास्क चे वितरण.

जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी केले मास्क चे वाटप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने बल्लारपूर विधानसभचे आमदार तथा माजी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ५ हजार मास्क चे वाटप केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य राहुल संतोषवार यांनी पोंभुर्णा तालुक्यात दिवसे दिवस कोरोना वाढत असल्यामुळे प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून उमरी पोतदार, घनोटी नंबर 2, आंबेधानोरा, डोंगरहळदी तुकुम, बोर्डा बोरकर, भटारी, केमारा, देवई इ. गावात फिरून नागरिकांना मास्क चे वाटप करीत कोरोनाशी लढण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात सर्वत्र मोठया प्रमाणात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने गावातील नागरिकांनी कोरोना सारख्या घातक महामारी विषाणू पासून वाचविण्याकरिता मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे, विना कामाने घराबाहेर पडू नये, गर्दीत जाणे टाळावे, या शासनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या परिवाराची काळजी घ्यावे असे आव्हान राहुल संतोषवार यांनी यावेळी नागरिकांना केलेले आहे.
यावेळी मास्क वाटप करतांना मंगेश उपरे उपसरपंच ग्रा. पं.उमरी पोतदार, सौ.यशोदा संदीप ठाकरे सरपंच, ग्रा.पं.घनोटी तुकुम,श्री.पवन गेडाम, ग्रा पं. सदस्य, श्री.नरेश कोडापे ग्रा.पं. सदस्य,श्री. नानाजी टेकाम श्री.रमेश हलमलवार, उपसरपंच ग्रा. पं. आंबेधानोरा,सौ.कविताताई जनगणवार,सौ.कुंदाताई जुमानाके, सौ.मनीषा हलमलवार,श्री.राकेश कोडापे,श्री.शुभम रेगुलवार, श्री. रुपेश जुमानाके श्री.सचिन पोतराजे सरपंच ग्रा.पं. केमारा, श्री.नवनाथ आत्राम उपसरपंच, सौ.ज्योती आत्राम ग्रा.पं.सदस्य, सौ.सपना आलाम,श्री.गोपाल आत्राम, श्री.सचिन पोरेते व इतर भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत