जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव बु. येथे वितरण.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उपक्रम संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- मा. नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र सरकार तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दि. 28/5/2021 ला प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव बु येथे डॉक्टर ,नर्स , सर्व कर्मचारी स्टाफ यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.


भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मा श्री राजूभाऊ गायकवाड बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, डॉ भगवान गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, बाबाभाऊ भागडे ज्येष्ठ नेते भाजपा ,ओम भाऊ मांडवकर भाजप नेते ,सचिन नरड जिल्हा महामंत्री युवा मोर्चा , सौ ज्योतीताई वाकडे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपुर,सौ शुभांगी निंबाळकर महिला अध्यक्ष वरोरा तालुका, सिद्धार्थ भाऊ पाटील सरपंच शेगाव बु ,राजुभाऊ बच्चुवार भाजपा नेते ,मानकर सर भाजपा नेते ,ईश्वर नरड ,अजय लोडे, महेश देवतळे, राकेश काढवटे,मंगेश मडावी, गौरव पवार ,भाजप कार्यकर्ता व गावकरी वर्ग उपस्थित होते.
तसेच ज्या रुग्णाला अक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आवश्यकता भासेल त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव बु तसेच सचिन नरड जिल्हा महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा यांचेशी संपर्क साधावा असे आव्हान सचिन नरड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत