Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

शहीदांचे बलिदान देशातील युवकांना नवचेतना देणारे:- डॉ. मंगेश गुलवाडे #chandrapur

शहीद दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने अभिवादन
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने शहीद दिना निमित्य शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना पुष्प अर्पण करून अभिवादन चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांचे बलिदान हे भारतातील युवकांना देशसेवेसाठी नवचेतना देणारे असुन आज शहीद दिनानिमित्य प्रत्येक युवकांनी संकल्प करून कोणत्या ना कोणत्या सामाजिक माध्यमातून देश सेवा करण्यासाठी समोर येऊन युवकांनी स्वताः ला देशासाठी समर्पित करायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले.
सदर अभिवादन प्रसंगी संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासनगोटुवार,ब्रिजभूषन पाझारे,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर,महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर, महानगपालिका स्थायी समिती सभापती संदीप आवारी, गटनेत्या जयश्री जुमडे,मंडळ अध्यक्ष रवि लोणकर,नगरसेवक राहुल घोटेकर,शीतल आत्राम,महानगर सचिव प्रमोद शास्त्रकार, राजेंद्र खांडेकर,चंदन पाल,रामकुमार अक्कापेल्लीवार,अरविंद कोल्हनकर, चांद पाशा मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी,अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष अमीन शेख,किसान मोर्चा अध्यक्ष रवी चहारे,मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर,सचिन कोतपल्लीवार,महेंद्र जुमडे,रितेश वर्मा,विमल शहा,शिक्षक आघाडी अध्यक्ष मोहम्मद जिलानी, मंडळ महामंत्री पुरुषोत्तम सहारे, राजू जोशी,महिला मोर्चा महामंत्री शिला चव्हाण, उपाध्यक्षा प्रभा गुळढे,लीलावती रविदास,रामनारायण रविदास,विनय कावडकर,नितीन करीया,किशोर आत्राम,यांची प्रामुख्याने उपस्थिती होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत