Home/वणी तालुका/चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी काँग्रेसने कोणताही सर्व्हे केला नाही:- नाना पटोले #chandrapur #chandrapurloksabha #loksabha #loksabhaelection
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी काँग्रेसने कोणताही सर्व्हे केला नाही:- नाना पटोले #chandrapur #chandrapurloksabha #loksabha #loksabhaelection
चंद्रपूर:- चंद्रपूरचे काँग्रेसचे दिवंगत खासदार स्व. बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपचाही उमेदवार उतरण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसने ऑनलाई सर्व्हेही घेतला आहे. मात्र, सध्या काँग्रेसमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सात नेते इच्छूक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Congress did not conduct any survey for Chandrapur-Vani-Arni Lok Sabha:- Nana Patole)
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी काँग्रेसने कोणताही सर्व्हे केला नाही:- नाना पटोले
खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा नवा उमेदवार कोण असा सर्व्हे सध्या समाजमाध्यमात घेतला जात आहे. हा काँग्रेसचा सव्हें असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असा कोणताही सव्हें कांग्रेस पक्ष समाजमाध्यमावर करीत नाही. हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे. त्याचा शोध घेवून कारवाई करू, असा इशारा दिला.
"हा" सर्व्हे धानोरकर कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी:- शहराध्यक्ष राम तिवारी खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा नवा उमेदवार कोण असा सर्व्हे सध्या समाजमाध्यमात घेतला जात आहे. हा सव्हें धानोरकर कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक केला जात आहे. यामागे नेमका कुणाचा हात आहे, याचा शोध घेण्याची मागणी शहराध्यक्ष राम तिवारी यांनी केली. प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय यांनीसुद्धा सर्व्हे अशाप्रकारे केले जात नाही. हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे, असा संशय व्यक्त केला.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागणार? चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे दिवंगत खासदार स्व. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी नुकतेच अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा आता रिक्त झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर लोकसभेसाठी लवकरचं पोटनिवडणुक जाहीर केल्या जाईल काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा महाराष्ट्रात एकमेव खासदार म्हणून स्व. बाळू धानोरकर निवडून आले होते. अलीकडेच (३० मे रोजी) अल्पशा आजाराने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात खासदार स्व. धानोरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंद्रपूर लोकसभेची जागा आता रीक्त झाली. त्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आल्याचे दिसते आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी काँग्रेसने कोणताही सर्व्हे केला नाही:- नाना पटोले #chandrapur #chandrapurloksabha #loksabha #loksabhaelection
Reviewed by Bhairav Diwase
on
शनिवार, जून १०, २०२३
Rating: 5
कोणत्याही टिप्पण्या नाहीत