Chandrapur News: चंद्रपूरची 'शक्ती' आणि महाराष्ट्राची 'भक्ती'

Bhairav Diwase
२० मिनिटे, २० लावण्या अन् विश्वविक्रम?
चंद्रपूर:- चंद्रपूर आता एका जागतिक इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले आहे! महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या लावणी नृत्याला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी चंद्रपूरच्या भूमीत एक अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे.

'उत्कृष्ट महिला मंच, चंद्रपूर' तर्फे आयोजित या सोहळ्यात जिल्ह्यातील तब्बल ३००० महिला आणि मुली एकाच वेळी, एकाच तालावर '२० मिनिटे २० लावण्या' सादर करणार आहेत. हा केवळ डान्स नाही, तर 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नाव कोरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

या ऐतिहासिक उपक्रमाला खंबीर साथ लाभली आहे ती सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनची. या जागतिक विक्रमाच्या प्रमाणपत्राचे मुख्य प्रायोजक म्हणून संस्थापक अध्यक्ष माननीय पांडुरंगजी आंबटकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. महिला सक्षमीकरण, संस्कृती जतन आणि युवा कौशल्य विकासाचा हा अनोखा त्रिवेणी संगम १ मार्च रोजी पाहायला मिळेल.