आईसह प्रियकर व खरेदीदार महिलांवर गुन्हा दाखल
चंद्रपूर : पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या गोळ्यांचा सौदा करणाऱ्या एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा चंद्रपुरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या दोन निष्पाप मुलांची अवघ्या दोन लाखांत विक्री केल्यानंतर, या निर्दयी महिलेने आपल्याच १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा घाट घातला होता. मात्र, रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भयानक डाव उधळला गेला असून, या रॅकेटचे 'बिंग' फुटले आहे.
याप्रकरणी रामनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि.२९) आरोपी आईसह बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नराधम प्रियकर अजय फुलझेले (२६, रा. चंद्रपूर) हा सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. चौघांवर मानवी तस्करी व पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Social Plugin