Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात आज औषध दुकाने कडकडीत बंद!

Bhairav Diwase

ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ चंद्रपुरात 'मेडिकल बंद'चा एल्गार
चंद्रपूर:- आज चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर औषध विक्रीच्या निषेधार्थ 'अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाने' (AIOCD) हा मोठा निर्णय घेतला होता. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा एल्गार पुकारण्यात आला होता. आज चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्णतः व्यवहार बंद ठेवले गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल १९ मे च्या मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा संप आज २० मे च्या मध्यरात्रीपर्यंत २४ तास चालणार आहे. ऑनलाईन या बंदचा मोठा परिणाम आरोग्य सेवेवर झालेला आहे.