चंद्रपूर:- रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडोबा रोडवर एका बसने सायकलस्वाराला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटना आज सकाळच्या सुमारास तुकूम परिसरातील पोलीस कल्याण सभागृह समोर घडली. विनायक गंगाधर पराते, वय ५३ वर्षे, राहणार तुकूम, हे आपल्या सायकलने जात असताना MH 40 N 9429 या क्रमांकाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, विनायक बच्चा चाकाखाली आल्याने चिरडले गेले आणि विनायक पराते यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. सकाळी सकाळीच घडलेल्या या भीषण अपघातामुळे तुकूम आणि ताडोबा रोड परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

