(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट )या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंम्मेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2020 नुकताच ऑनलाईन झूम ऍपवर संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहूने मा. ह.भ.प. केशवजी महाराज सुपरिचित राष्ट्रीय कीर्तनकार तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.ऍड. कृष्णाजी जगदाळे आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा घेण्यात आला. या सोहळ्यात नीरज आत्राम, आनंदवन वरोरा, यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीरज आत्राम हे आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय आनंदवन,वरोरा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांना आदी वेगवेगळ्या पुरस्काराने अनेक संस्थेकडून सन्मानित करण्यात आले आहे.
विविध साहित्य काव्य, लेख स्पर्धेत ते सहभागी होऊन सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय तृतीय, सन्मानपत्राने सन्मानित झाले आहेत तसेच ते काव्य परीक्षक म्हणून सुद्धा कार्य पार पाडले आहेत त्यांचा "चारोळ्यांची माळ" हा काव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे. याव्यतिरिक्त ते महाराष्ट्र शासनांनी कोरोना महामारी मध्ये रक्तदानासाठी आव्हाहन केलं होत तेव्हा नीरज आत्राम यांनी रक्तदान केलेलं आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्य,निवडणूक कार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, क्रीडा विभागात सुद्धा सहभाग घेऊन कार्य केलेलं आहे.
या कार्यक्रमात उपस्थितांना मान्यवरांनी संबोधित केलं नंतर ऑनलाईन ग्लोबल गुणिजन शपथ प्रदान केली.गुणिजन पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.पुरस्काराचे स्वरूप,मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र,गौरवपदक, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे आहे हा पुरस्कार रजिस्टर्ड करून पोस्टाने घरपोच पोहचविण्यात व्यवस्था करण्यात आली आहे कारण सर्वांना माहीतच आहे कोरोना महामारी असल्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला मान्यता मिळाली नाही म्हणून अश्या प्रकारचे ऑनलाईन कार्यक्रम घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.