Top News

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची छतावरील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या.


Bhairav Diwase.     March 04, 2021 
यवतमाळ:- पोटाच्या आजाराला कंटाळलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारी (३ मार्च, २०२१) रात्री उघडकीस आली. वैशाली दशरथ विधाते (रा. मुकुटबन, ता. झरी, जि. यवतमाळ) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.

सूत्रांनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून वैशाली विधाते या पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या. अनेक डॉक्टरांकडे उपचार करूनही प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

त्याच्या पोटाचा आजार वाढतच गेल्याने त्यांना आजार असह्य होत होता. अखेर काल बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी आपल्याच घराच्या छतावरील एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाकीत उडी घेतली.

तिच्या पश्चात पती दशरथ झितृजी विधाते हे आहेत. ते आश्रम शाळा मारकी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांना दोन मुली आहे. काल सायंकाळच्या सुमारास त्या घरी आढळून न आल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली. त्यांचा मृतदेह छतावरील पाण्याने भरलेल्या टाकीत आढळून आला. मुकुटबन पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास मुकूटबन पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने