🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जिल्ह्यात सर्वत्र कोविड योद्ध्यांचा सत्कार. #Coronawarriors

कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन करून कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्याचे भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांचे आवाहन.
चंद्रपूर:- राज्याचे माजी अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लोकलेखा समिती प्रमुख, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ५९ वा वाढदिवस उद्या (३० जुलै) रोजी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. #Coronawarriors
यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्वत्र ( २२ ही मंडळात) सर्व कोविड योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी दिली.
याठिकाणी, कोरोणा महामारीमध्ये योद्ध्यांप्रमाणे लढा देवून प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे जनसेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, रुग्णवाहिका शववाहिकांचे चालक, शासकीय कर्मचारी, विद्युत, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, कुरीअर बॉय, औषधविक्रेते, पत्रकार, आटाचक्कीवाले, भाजीपाला विक्रेते, किराणा विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, दुधविक्रेते, सिलेंडर बाॅय, ऑटोचालक इत्यादी. अशा सर्व कोविड योद्ध्यांचा सत्कार उद्या करण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील समस्त भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या स्थानिक मंडळात मोठ्या संख्येत उपस्थित राहून कोरोणा नियमाचे पालन करत पूर्ण शक्तीनिशी उद्याचे सेवा दिन साजरे करावे. असे आवाहन भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले आहे.