जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर (ग्रामीण) जिल्हा महामंत्रीपदी मिथिलेश पांडे यांची नियुक्ती. #Appointment


बल्लारपूर:- बल्लारपूरचे मिथिलेश पांडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर (ग्रामीण) जिल्हा महामंत्रीपदी नियुक्ती राज्याचे माजी अर्थमंत्री, सध्याचे लेखा समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजय दुबे यांच्या शिफारशीनुसार युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांनी मिथिलेश पांडे यांनी केलेले काम पाहता त्यांची नियुक्ती केली. मिथिलेश पांडे यापूर्वी जिल्हा सचिव दोन वेळा विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष आणि संयोजकांची जबाबदारीही सांभाळत होते.
मिथिलेश पांडे यांची महामंत्रीपदी नियुक्ती झालाबद्दल परिवहन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतविंदरसिंग दारी, तालुका अध्यक्ष गुलशन शर्मा, गोपाल रेड्डी, कामगार नेते कैलाश गुप्ता, सुजित निर्मल, भाजपा शहर सचिव मनीष रमिला, अशोक सोनकर, श्रीकांत उपाध्याय, श्रावण मोग्रम, रिंकू गुप्ता, आबिद भाई इत्यादींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत