Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला खिंडार #chandrapur #gondpipari #rajura


गोंडपिपरीतुन राहुल चौधरी तर राजुरा येथून हरजित सिंग सिंधूचा भाजपात प्रवेश
चंद्रपूर:- जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.

गोंडपिपरी काँग्रेस चे जेष्ठ नेते बाजार समिती सभापती सुरेश चौधरी यांचे चिरंजीव राहुल चौधरी, राजुरा कॉग्रेस माजी नगरसेवक हरजित सिंग सिंधू, सामजिक कार्यकर्त्या सौ स्वरूपा झंवर, सौ नम्रता खोंड, सौ. अनुष्का रैच, सौ. मीरा कुलकर्णी, सौ मनिषा भाके यांनी काल माजी आमदार संजय धोटे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.


कॉंग्रेस नेते राहुल चौधरी, राजुरा कॉग्रेसचे माजी नगरसेवक हरजित सिंग सिंधू यांच्या प्रवेशाने मोठी राजकीय खळबळ माजली असून लवकरच शेकडो कार्यकर्ते व काही काँग्रेस पदाधिकारी देखील काँग्रेसला रामराम करणार असल्याची चर्चा राजुरा विधानसभा क्षेत्रात असून भाजपला कॉंग्रेस नेते राहुल चौधरी, राजुरा कॉग्रेसचे माजी नगरसेवक हरजित सिंग सिंधू प्रवेशाने संघटनात्मक फायदा होईल असे मत भाजपचे माजी आमदार संजय धोटे यांनी व्यक्त केले.

1 टिप्पणी: