चंद्रपूर:- सावकारीच्या भयंकर विळख्यात अडकून, एका व्यक्तीवर चक्क स्वतःची किडनी विकण्याची अत्यंत वेदनादायी वेळ आली होती. पण आज याच कुटुंबाच्या अंधारमय आयुष्यात आशेचा एक नवा किरण उगवला आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रहिवासी रोशन कुळे यांच्या कठीण प्रसंगात त्यांच्या वेदना समजून घेत, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच प्रयत्नांमुळे रोशन कुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.
आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ५ लाख रुपयांचा धनादेश रोशन कुळे आणि त्यांच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून, संकटाच्या काळात कुळे कुटुंबाला आधार देणारा एक माणुसकीचा हात ठरली आहे.


