राजूरा-गडचांदूर मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. #gadchandur

Bhairav Diwase
0
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले वंचित चे जिल्हाध्यक्ष फुसे

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.


कोरपना:- राजूरा-गडचांदूर मार्गावरील हरदोना गावाजवळ एका MH 34 V 4850 या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. यात दुचाकीस्वार जखमी अवस्थेत खाली पडला होता. वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे गडचांदूर ला जात असतांना अपघातग्रस्त इसम रोडच्या कडेला बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत आढळला दरम्यान फुसे यांनी सदर इसमाची पाहणी करून तात्काळ आपत्कालीन 112 क्रमांकावर संपर्क साधला.


काही वेळातच गडचांदूर रुग्णालयातील एम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली अनैशा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सुरज उपरे, सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे, वंचित बहूजन आघाडीचे राजेंद्र नळे, रवींद्र करमणकर व सुरज करमणकर यांच्या मदतीने अपघातग्रस्त इसमाला गडचांदूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यासाठी हलविण्यात आले.

भूषण फुसे यांनीही कार्यकर्त्यांसोबत पाठोपाठ रुग्णालय गाठून अपघातग्रस्ताची तब्बेतीबाबत सुखरूप असल्याची माहिती जाणून घेतली आणि चंद्रपूर परतीचा प्रवास गाठला. भूषण फुसे वेळीच अपघातग्रस्ताच्या मदतीला धावल्याने एका निष्पाप व्यक्तीचे प्राण वाचले याचे समाधान गडचांदूर परिसरातील वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)